गरीबांच्या जनधन खात्यात आतापर्यत जमा केले एवढे कोटी रुपये जमा


नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजबद्दलची माहिती दिली जात आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांना दिल्या जाणाऱ्या मदतीची मागील चार परिषदांमध्ये घोषणा केल्यानंतर आज अर्थमंत्र्यांनी सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. त्यांनी सुरुवातीलाच जमीन, कामगार, लिक्विडीटी आणि कायदा संदर्भात मोठ्या घोषणा केल्या आहेत.

केंद्र सरकारतर्फे गरीबांना आर्थिक सहाय्य केले जात आहे. त्याचबरोबर राज्य सरकारतर्फे देखील ही मदत केली जात आहे. गरीबांना ३ महिन्यांचे धान्य देण्यात आले आहे. जनधन योजनेमार्फत २० कोटी खातेधारकांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले असून ही रक्कम १,००,०२५ कोटी एवढी आहे. तर ८.१९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २-२ हजार रुपये पाठवण्यात आले आहेत. महिलांच्या खात्यात १० हजार कोटी देण्यात आले आहेत. बांधकाम मजुरांना ५०.३५ कोटी देण्यात आल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सीतारमन म्हणाल्या, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि गरिबांवर उपाशीपोटी झोपण्याची वेळ येऊ नये म्हणून मागील दोन महिन्यांच्या काळात सरकारने अनेक उपाययोजना राबवल्या. गरिबांना, स्थलांतरित मजुरांना मदत देण्याचा प्रयत्न केला. ही मदत पंतप्रधान गरीब योजनेतंर्गत करण्यात आली. तंत्रज्ञानामुळे गरिबांना तातडीने थेट मदत करता आली.

यावेळी निर्मला सीतारमन यांनी आरोग्य विभागासाठी १५ हजार कोटींची घोषणा केली आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ५० लाखांचा विमा, टेस्टींग, लॅब साठी ५५० कोटी, कोरोनासाठी राज्यांना ४११३ कोटी रूपये जाहीर केले आहेत. ग्रामीण भागात शिक्षणासाठी ऑनलाईनवर भर देण्यात येणर आहे. ऑनलाईन क्लाससाठी नवे १२ चॅनल, ई स्कूलमध्ये २०० नवीन पुस्तकांचा समावेश करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर सरकारकडून स्थलांतर करणाऱ्या मजुरांची काळजीही घेण्यात आली. या मजुरांना घरी जाण्यासाठी सरकारकडून रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. त्याचबरोबर त्यांच्या भाड्याच्या ८५ टक्के खर्च केंद्राने उचलला आहे. सरकारने प्रवासादरम्यान त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. अन्न धान्य दिल्यानंतर त्यासाठी उज्ज्वला गॅसयोजनेतंर्गत मोफत सिलेंडर देण्यात आल्याची माहिती सीतारमन यांनी दिली.

Leave a Comment