शाओमी रेडमी के ३० प्रो ट्रान्सपरंट पॅनेल येणार?

फोटो साभार नवभारत टाईम्स

शाओमीचे सिनिअर प्रोडक्शन मॅनेजर आणि ग्लोबल प्रवक्ते डेनियल डी यांनी शाओमी रेडमी के ३० प्रोचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला असून या फोटोत हा फोन ट्रान्सपरंट ग्लास बॅक पॅनल सह दिसत आहे. त्यामुळे आता के ३० प्रो या नवीन अवतारात दिसणार काय याची चर्चा सुरु झाली असली तरी हा फोन कंपनी रिलीज करणार वा नाही याची कोणतीही माहिती दिली गेलेली नाही. कदाचित हा फोन म्हणजे इंटर्नल कन्झम्शन साठीचे कस्टमाईज व्हर्जन असेल असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

शाओमीने यापूर्वी २०१८ मध्ये मी ८ एक्सप्लोर एडिशन ट्रान्सपरंट बॅक पॅनल सह तसेच २०१९ मध्ये मी ९ फ्लॅगशिप एक्सप्लोर एडीशनही ट्रान्सपरंट बॅक पॅनल सह पेश केला होता. रेड मी के ३० प्रो ग्लास बॅक पॅनलवर फक्त रेड मी लोगो खालच्या बाजूला अगदी छोट्या अक्षरात दिसतो आहे. ग्लास पॅनल मुळे फोनच्या आतील हार्डवेअर आरपार दिसते आहे.

Leave a Comment