वानखेडे स्टेडियम होणार क्वारंटाईन सेंटर!


फोटो साभार ग्लोबल न्यूज
मुंबईच्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडियम मध्ये क्वारंटाईन सुविधा देण्याची योजना आखली जात आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे बृहन्मुंबई महापालिकेने हे स्टेडियम क्वारंटाइन सेंटर म्हणून वापरास परवानगी द्यावी असे पत्र लिहिले होते त्यावर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

महाराष्ट्रात कोविड १९ चा प्रभाव देशात सर्वाधिक असून एकट्या मुंबईतच १७ हजाराहून अधिक संक्रमित सापडले आहेत. राज्यात कोविड १९ संक्रमितांची संख्या २९१०० वर गेली असून त्यामुळे क्वारंटाईन सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देणे आवश्यक बनले आहे. देशातील अन्य राज्यांनी तेथील स्टेडियम अश्या वापरासाठी यापूर्वीच उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेनेही एमसीए कडे वानखेडे स्टेडियम तात्पुरत्या स्वरुपात क्वारंटाइन सेंटर म्हणून तयार केले जावे असे पत्र लिहीले होते.

बीएमसीच्या आकडेवारीनुसार मुंबईत संक्रमितांची संख्या १७५१२ असून ६५५ मृत्यू झाले आहेत. शुक्रवारी ४६५८ पेशंटना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज दिला गेला आहे. वानखेडे मधील क्वारंटाइन केंद्रात इमर्जन्सी स्टाफ आणि करोना पेशंटना क्वारंटाइन करण्याची योजना आहे.

Leave a Comment