धकधक गर्ल माधुरी आहे २५० कोटींची मालकीण

फोटो साभार जनसत्ता

बॉलीवूडमध्ये कोणाकडे किती संपत्ती, सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार कोण, कुठली अभिनेत्री जास्त सुंदर अश्या चर्चा नेहमीच होतात. आपली मराठमोळी धकधक गर्ल माधुरी दीक्षित नेने हिने तिचा ५३ वा वाढदिवस १५ मे रोजी साजरा केला. माधुरी आता चित्रपटात फारशी दिसत नसली तरी रीअॅलिटी शो, जाहिराती यातून चांगलीच झळकते आहे. विशेष म्हणजे आजच्या आघाडीच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या दीपिका, प्रियांकाच्या तुलनेत कमी मानधन मिळूनही माधुरी या दोघींपेक्षा अधिक श्रीमंत असल्याचे सांगितले जाते

मध्यमवर्गीय कुटुंबातील माधुरीच्या चित्रपट प्रवेशाची सुरवात अबोध पासून झाली आणि त्यानंतर काही काळ तिने आघाडीची नायिका म्हणून नाव कमावले. २००८ मध्ये डॉ. श्रीराम नेने याच्याशी विवाह करून ती काही काळ अमेरिकेत होती. आता ती मुंबईत परतली आहे. माधुरीची राहणी अतिशय लग्झुरीयस असून अनेक प्रकारच्या महागड्या गाड्या, महागडी घरे तिच्या मालकीची आहेत. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही तिच्या नावे प्रॉपर्टीज असून मियामी येथे मॉल, फ्लोरिडा येथे एक मोठी प्रॉपर्टी तिने नुकतीच खरेदी केल्याचे सांगितले जाते. तिची एकूण प्रॉपर्टी आहे २५० कोटी.

 

माधुरीच्या ताफ्यात ऑडी, रोल्स रॉयस सह अनेक महागड्या कार्स आहेत. आजही टीव्ही शो, जाहिरातीतून ती मोठी कमाई करते. अनेक बड्या उत्पादनांच्या जाहिराती तिच्याकडे असून युरेका फोर्ब्सच्या वॉटर प्युरीफायरची जाहिरात पतीसह करण्यासाठी त्यांनी १०० कोटी रुपये घेतल्याचे सांगितले जाते. हा करार ५ वर्षासाठीचा आहे. बॉलीवूड मध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या दीपिकाची मालमत्ता ८० कोटींची तर प्रियांकाची मालमत्ता ६७ कोटींची असल्याचेही सांगितले जाते.

Leave a Comment