जागतिक बँकेचे भारतासाठी 7500 कोटींचे सोशल प्रोटेक्शन पॅकेज

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर जागतिक बँकेने भारताला 1 अब्ज डॉलरचे (जवळपास 7500 कोटी रुपये) सोशल प्रोटेक्शन पॅकेज देण्याची घोषणा केली आहे. हे पॅकेज भारत सरकारच्या कार्यक्रमाशी जोडलेले आहे.

कोरना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जन-जीवन अस्त व्यस्त झाले आहे. अर्थव्यवस्थेला देखील मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभुमीवर जागतिक बँकेकडून ही मदत देण्यात आली आहे.

जागतिक बँकेचे भारताचे प्रमुख जुनैद अहमद म्हणाले की, जागतिक बँक तीन क्षेत्रात भारतासोबत भागीदारी करेल. यामध्ये आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि सुक्ष्म, लघू आणि मध्य उद्योगांचा समावेश आहे. भारताच्या सामाजिक सुरक्षेला प्रवासी, असंघटित कामगार, पोर्टेबिलिटी आणि प्रणालीच्या एकीकरणाच्या निर्मितीसाठी प्रेरित केले जाईल. दरम्यान बँकेने 25 विकासशील देशांसाठी पॅकेज देणार असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment