कौतुकास्पद ! या कॉलनीने उचलली 800 कामगारांची जबाबदारी

उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा येथील कोतवाली भागातील सत्यम एनक्लेव कॉलनीमध्ये जवळपास 50 हजार लोक राहतात. आजबाजूला इंडस्ट्रियल भाग असल्याने कामगारांची मोठी संख्या आहे. लॉकडाऊनमध्ये काही दिवस संघटना, राजकीय पक्षांनी या कामगारांना जेवण दिले, मात्र नंतर ते बंद झाले. कॉलनीमधील लोकांना याची माहिती मिळताच 250 लोकांनी ग्रुप बनवत या कामगारांच्या जेवणाची सोय करण्याचा निर्णय घेतला. मागील दीड महिन्यापासून या कॉलनीतील लोक सकाळ-संध्याकाळ 800 कामगारांना जेवण देत आहेत. या संदर्भात नवभारत टाईम्सने वृत्त दिले आहे.

250 लोकांच्या या ग्रुपने सुरूवातील स्वेच्छेने निधी देण्यास सुरूवात केली. त्यानंतर हळूहळू इतरांकडून देखील निधी मिळू लागला. त्यांनी स्वतःचे किचन सुरू केले. किचनच्या संचालनाची जबाबदारी एका इंसिट्यूटचे अधिकारी परमानंद कौशिक यांना देण्यात आली आहे. ते किचनमधील सर्व वस्तूंची नोंद ठेवतात. प्रत्येकाने काम वाटून घेतले आहे. 800 कामगारांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांच्यापर्यंत जेवण पोहचविण्याची काम एका व्यक्तीला देण्यात आले आहे.

कॉलनीमधील सुदामा सोनी, कुलदीप भाटी, नरेंद्र शर्मा, रविंद्र भाटी, रविंद्र कुमार, त्रिलोक चंद, रवि कुमार असे अनेकजण जेवण बनविण्यापासून ते पॅकिंग करण्यापर्यंत सर्व कामात मदत करत आहेत.

Leave a Comment