या कॅफेने आणली ‘सोशल डिस्टेंसिंग हॅट’ची अनोखी शक्कल

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी सोशल डिस्टेंसिंगचे पालन करण्यास सांगितले जात आहे. अनेक दुकाने, हॉटेल आपल्या ग्राहकांनी सोशल डिस्टेंसिंगचे पालन करावे यासाठी विविध कल्पना लढवत आहेत. जर्मनीमधील एका कॅफेचे असेच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. येथे सोशल डिस्टेंसिंग हॅट घालणाऱ्यांचीच ऑर्डर घेतली जाते.

ट्विटरवर थॉमस स्पॅरो नावाच्या युजरने हे फोटो शेअर केले आहे. फोटो शेअर करत लिहिले की, जर्मनीच्या श्वेरिन येथील एका कॅफेमधील सोशल डिस्टेंसिंग हॅट. जर या हॅट्स घातल्या नाहीतर जेवण मिळणार नाही.

सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या हटके कल्पनेचे कौतूक केले.

काही दिवसांपुर्वी चीनच्या हांगझोऊ येथील शाळेतील विद्यार्थ्यांचे असेच सोशल डिस्टेंसिंग हेडगियर घातल्याचे फोटो व्हायरल झाले होते.

Leave a Comment