आयपीएल न झाल्यास 4,000 कोटींचे नुकसान – गांगुली

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रिडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. याचा फटका यंदाच्या आयपीएलला देखील बसला आहे. जर आयपीएल झाले नाहीतर बीसीसीआयला मोठे नुकसान होऊ शकते असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने म्हटले आहे. सोबतच आयपीएल रद्द झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील कपात करण्याचे संकेत दिले आहेत.

मिड डेशी बोलताना गांगुली म्हणाला की, आर्थिक स्थितीची पाहणी करण्याची गरज आहे. आमच्याकडे किती पैसे आहेत हे पाहून निर्णय घेतला जाईल. आयपीएल न झाल्यास 4 हजार कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. जर आयपीएल झाले तर पगार कपात करावी लागणार नाही.

विना प्रेक्षकांचे सामने भरविण्याविषयी गांगुलीने सांगितले की, हे कमी आकर्षक असेल. त्याने 1999 साली एशियन टेस्ट चॅम्पियनशीपमधील पाकिस्तान विरुद्धच्या इडन गार्डनवरील सामन्याची देखील आठवण करून दिली. सोशल डिस्टेंसिंगचे पालन करत कमी लोकांमध्ये सामने भरवल्यास पोलिसांना कठोर व्हावे लागेल. हा अवघड निर्णय आहे.

Leave a Comment