आता येणार कोरोनाचा संपर्क झाल्यावर रंग बदलणारा मास्क

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क वापरणे गरजेचे आता. आता वैज्ञानिक असा मास्क तयार करत आहे, जो व्हायरसच्या संपर्कात येताच रंग बदलेल. यात लावलेले सेंसर्स व्हायरसचा स्पर्श होताच संक्रमणाचा धोका आहे की नाही याची माहिती देतील. मॅसाच्युसेट्स इंसिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (एमआयटी) आणि हार्वर्ड यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी 2014 मध्ये झिका आणि ईबोला व्हायरसच्या संपर्कात येताच सिग्नल देणारा मास्क बनवला होता. या संस्थेचेच वैज्ञानिक कोरोना व्हायरससाठी मास्क बनवत आहेत. वैज्ञानिक जो मास्क बनवत आहेत तो व्हायरसच्या संपर्कात येताच चमकायला सुरूवात करेल.

वैज्ञानिक जिम कॉलिंस यांनी सांगितले की, जर एखादा कोरोनाग्रस्त या मास्क समोर श्वास घेत असेल, शिंकेल किवा खोकल्यास मास्कचा रंग बदलेल व मास्क चमकण्यास सुरूवात करेल. हा प्रोजेक्ट अद्याप सुरूवातीच्या टप्प्यात आहे. पुढील काही दिवसात या मास्कचे ट्रायल केले जाईल. यश मिळण्याची पुर्ण आशा आहे. आम्ही यंदा मास्कमध्ये पेपर आधारित डायग्नोस्टिकच्या जागी प्लास्टिक, क्वार्ट्ज आणि कपड्याचा उपयोग करत आहोत.

या मास्कच्या आता कोरोना व्हायरसचा डीएनए आणि आरएनए आल्यास मास्कच्या आतील लायोफिलाइजरसोबत मिळून रंग बदलेल. हा मास्क अनेक महिने वापरता येईल. मास्कमधील लायोफिलाइजर ओले झाल्यास म्हणजेच व्हायरसचे जेनेटिक सिक्वेंस मास्कच्या संपर्कात येताच रंग बदलेल.

Leave a Comment