शरीराचे तापमान सांगणारा पहिला वहिला ‘स्मार्ट Band’ लाँच

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी तंत्रज्ञानाची मोठी मदत होत आहे. याचाच एक भाग म्हणून जीओक्यूआयआय कंपनीने शरीराच्या तापमानाची माहिती देणारे जगातील पहिले स्मार्ट रिस्ट बँड लाँच केले आहे. शरीराचे तापमान किती आहे, याची माहिती जीओक्यूआयआय व्हिटल 3.0 (GOQii Vital 3.0) स्मार्ट बँडद्वारे मिळेल. हे बँड ब्लड प्रेशर, ब्लड ग्लुकोझ, एचबीए1 लेव्हलची देखील माहिती देते. युजर्सला हा सर्व डाटा जीओक्यूआयआयच्या अ‍ॅपमध्ये पाहू शकतील.

जीओक्यूआयआयचे संस्थापक आणि सीईओ विशाल गोंडाल यांनी सांगितले की अ‍ॅपल वॉचप्रमाणेच कंपनीच्या पुढील स्मार्ट बँडमध्ये ईसीजी फीचर देखील मिळेल.

Image Credited – indianexpress

जीओक्यूआयआय स्मार्ट बँड केवळ त्वचेला स्पर्श करून शरीराचे तापमान सांगेल. हे स्मार्टबँड खासकरून उद्योग आणि कोरोनाच्या लढ्यात पुढे येऊन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी असेल. इतरांसाठी खूप कमी यूनिट्स उपलब्ध असतील. इच्छुक ग्राहक कंपनीच्या अ‍ॅपवरून 3,999 रुपयांमध्ये बँड खरेदी करू शकतील. लवकरच अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर देखील उपलब्ध होईल. तसेच, कंपनीने या स्मार्ट बँडचे 1000 यूनिट्स मुंबई पोलिसांना दिले आहेत.

या बँडमध्ये कलर्ड डिस्प्ले, ऑटो स्लिप ट्रॅकिंग, हर्टरेट मॉनिटरिंग, मल्टी एक्ससाईज मोडेम बिल्ड-इन यूएसबी, 7 दिवस चालणारी बॅटरी लाईफ, 12 महिन्यांचे जीओक्यूआयआय पे चे स्बस्क्रिप्शन आणि 3 महिन्यांचे हेल्थ कोच स्बस्क्रिप्शन मिळेल.

Leave a Comment