या एनआरआय डिझाईनरला मिळाली 550 कोटींची पोटगी

चॅनेल 4 या टेलिव्हिजन नेटवर्कवरील द सिक्रेट मिलेनियर या कार्यक्रमाद्वारे प्रसिद्ध झालेली इंटेरियर डिझाईनर सिमरिन चौधरीने अब्जाधीश पती भानू चौधरीपासून घटस्फोट घेतला आहे. या घटस्फोटात सिमरिनने पोटगी म्हणून 100 मिलियन पाउंड्सची मागणी केली होती, मात्र तिला पोटगी म्हणून 60 मिलियन पाउंड्स (जवळपास 552 कोटी रुपये) मिळाले आहेत.

भानू चौधरी हे  वेस्टमिनिस्टर येथील जागतिक खाजगी इक्विटी कंपनी सी अँड सी अल्पा ग्रुपचे संस्थापक असून, त्यांची एकूण संपत्ती 1.6 बिलियन पाउंड्स असल्याचे सांगितले जाते.

41 वर्षीय सिमरिन 2011 मध्ये द सिक्रेट मिलेनियर या कार्यक्रमात सहभागी झाली होती. तर भानू चौधरी हे सुधीर चौधरी यांचे पुत्र असून, सुधीर चौधरी यांनी 2004 पासून लिब्रल डेमोक्रॅट्स पक्षाला कोट्यावधींची देणगी दिली आहे. सिमरिन आणि भानू यांनी बल्गेरिया येथील आपल्या 20 मिलियन पाउंड्सच्या 6 मजली घराची विभागणी केली आहे.

Leave a Comment