सलाम ! हॉस्पिटलमधूनच कोरोनाग्रस्त शिक्षकाची विद्यार्थ्यांना शिकवणी

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शाळा-महाविद्यालय, क्लासेस सर्वकाही बंद आहे. अशा स्थितीत काही शिक्षक ऑनलाईन क्लासेस घेत आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. मात्र लद्दाखमधील एका कोरोनना पॉजिटिव्ह शिक्षकाने सर्वांसमोर आपल्या कार्याने आदर्श ठेवला आहे. कोरोना पॉजिटिव्ह असतानाही लद्दाखमधील किफायत हुसैन हे हॉस्पिटलमधून ऑनलाईन आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.

3 मे ला किफायत यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. लॅमडोन मॉडेल सिनियर सेंकडरी स्कूल, लेहच्या फेसबुक पोस्टनुसार, किफायत हे हॉस्पिटलमधून ऑनलाईन आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. त्यांच्यासाठी झूम क्लासेस आणि यूट्यूब व्हिडीयोजवर सेटअप करण्यात आले आहे. जेथे ते रेकॉर्ड केलेले व्हिडीओ अपलोड करतात.

किफायत म्हणाले की, शिकवणे हे फक्त माझे काम नसून, माझी आवड आहे. विद्यार्थी अभ्यासात मागे पडतील याची मला चिंता वाटत होती व भविष्यात अभ्यासक्रम वेगाने संपवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर ओझे आले असते. मी या परिस्थितही शिकवू शकतो, त्यामुळे मी एक प्रयत्न करून पाहिला.

इतर शिक्षकांप्रमाणेच त्यांनाही इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या जाणवते. त्यांनी सांगितले की कोरोनाग्रस्तांचे नाव जाहीर करण्यास नातेवाईक घाबरतात. मात्र माझ्या कुटुंबाला अशी कोणतीही समस्या नाही. कारण त्यांना माहिती आहे की शिकवणे माझी आवड आहे.

Leave a Comment