इंजिनिअरची डोकॅलिटी; दारूच्या रांगेत स्वतःच्या जागी उभे राहण्यासाठी तयार केला रोबॉट

लॉकडाऊनच्या निमयांमध्ये सुट दिल्यानंतर दारूच्या दुकानांपासून ते सामान खरेदीसाठी प्रत्येक दुकानाबाहेर रांगा लागत आहेत. मात्र तामिळनाडूचा इंजिनिअर कार्तिक वेलयुथमने सोशल डिस्टेंसिंग कायम ठेवण्यासाठी खास उपाय शोधला आहे. त्याने स्वतःच्या जागी रांगेत उभे राहण्यासाठी रोबॉटची निर्मिती केली आहे. कार्डबॉक्स आणि लाकडाच्या या रोबॉटला चार चाके असून, कार्तिकला याच्या निर्मितीसाठी 2 दिवस आणि 3 हजार रुपये खर्च आला.

31 वर्षीय कार्तिकने सांगितले की, मी आपल्या रोबॉटच्या ट्रायलसाठी त्याला दारूच्या दुकानावर पाठवले. जेणेकरून लोक पाहू शकतील की गर्दीच्या ठिकाणी याचा कसा वापर केला जातो. याशिवाय याद्वारे सोशल डिस्टेंसिंग आणि कोरोनाचा प्रसार रोखण्या संदर्भात लोकांना जागृक करता येते. या डिव्हाईसचे मी रस्त्यावर देखील परिक्षण केले आहे व यात काहीही समस्या नाही. हे सहज चालते. गिअर मोटारचा वापर केल्याने गतिरोधकावर देखील काहीही समस्या येत नाही.

कार्तिक आपल्या घरून या रोबॉटला नियंत्रित करू शकतो. स्मार्टफोनद्वारे इंटरनेटच्या मदतीने मशीन कंट्रोल करता येते. व्हिडीओ कॉलद्वारे काय खरेदी करायचे, ते सांगितले जाईल. मशीन 50 किलो वजन सांभाळण्यास सक्षम आहे.

कार्तिकने सांगितले की, या रोबॉटची खास गोष्ट म्हणजे याला कोठूनही नियंत्रित करता येते. खरेदी केलेले वस्तूंचे पेमेंट ऑनलाईन करता येते. हॉस्पिटल्समध्ये देखील याचा वापर करणे शक्य आहे. शॉपिंग, पोलीस पेट्रोलिंग आणि आगी सारख्या घटनेच्या वेळीही याचा वापर करता येईल.

Leave a Comment