लॉकडाऊन : मेरी कॉमच्या मुलाचा वाढदिवस, पोलिसांनी आणला केक, गायले गाणे

लॉकडाऊनमध्ये लहान मुलांचा वाढदिवस पालकांना अगदी साध्या पद्धतीने करावा लागत आहे. अशातच काही ठिकाणी पोलीस स्वतः केक घेऊन जात लहान मुलांचे वाढदिवस साजरा करत आहेत. अशाच प्रकारे दिल्ली पोलिसांनी ऑलिम्पिक विजेती बॉक्सर मेरी कॉमचा मुलगा प्रिन्सचा 7वा वाढदिवस देखील खास सरप्राईज देत स्पेशल बनवला आहे.

दिल्लीच्या तुघलक रोड पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी मेरी कॉमच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या घरी केक घेऊन पोहचले व प्रिन्सचा वाढदिवस साजरा केला. मेरी कॉमने या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मेरी कॉमने देखील मुलाचा वाढदिवस स्पेशल करण्यासाठी ट्विट करत पोलिसांचे आभार मानले. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सनी मुलाच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी पोलिसांचे कौतूक केले.

Leave a Comment