लॉकडाऊन : स्विमिंग आणि ड्रिकिंगमुळे पोलिसांनी या ब्यूटी क्विनला टाकले तुरुंगात


माजी सौंदर्यवती 26 वर्षीय मारिया गिगांटे आणि तिचा 35 वर्षीय प्रियकर जेव्हियर फिलोसा कास्ट्रोला लॉकडाऊनच्या उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. फिलिपाईन्समधील सेबू येथील मोअलबोल शहरातील किनाऱ्यावर स्विमिंग आणि दारू पिताना पोलिसांनी त्यांना पकडले. कोरोना व्हायरसमुळे सेबूमध्ये लॉकडाऊन आहे.

Image Credited – punjabkesari

मोअलबोल पोलीस स्टेशनचे अधिकारी अल्विनो इनग्युटो यांनी सांगितले की, मारियाने समुद्रात स्विमिंग आणि किनाऱ्यावर इतर गोष्टी करण्यास मनाई करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केले. तसेच शहरातील दारू बंदीचे देखील या जोडप्याने उल्लंघन केले आहे.

मारियाने बिनिबिनिंग सेबू चॅरिटी 2017 या सौंदर्य स्पर्धेत भाग घेत, तिसरे स्थान मिळवले होते.

Image Credited – punjabkesari

पोलिसांनी चेकपॉइंटवर अडवले असता जोडप्याने पॅट्रोल पार्टीलिस्ट संस्थेचे अधिकृत पत्र दाखवले. ज्यात मारियाच्या प्रियकरला संस्थेच्या वतीने वस्तूंचे वितरण करण्यास सांगितले होते. मात्र जेव्हा पोलिसांनी या जोडप्याचा शोध घेतला, त्यावेळी ते स्विमिंग आणि दारू पिताना आढळले. सेबू शहरात अनेक कोरोनाग्रस्त सापडल्याने दोघांनाही आयसोलेशन सेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

Leave a Comment