भारतीय वंशाच्या शेफशी लग्न करणाऱ्या ऑस्ट्रियाच्या 31 वर्षांच्या राजकुमारी यांचे निधन

भारतीय वंशाचे शेफ ऋषि रूप सिंह यांच्याशी लग्न करणाऱ्या ऑस्ट्रियाच्या राजकुमारी मारीया गल्टिझाईन यांचे वयाच्या 31व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. 2017 मध्ये मारिया आणि ऋषि रूप सिंह यांनी लग्न केले होते. ते अमेरिकेतील ह्युस्टन येथे राहत होते. त्यांना 2 वर्षांचा मुलगा आहे.  मारिया या ह्युस्टन येथे इंटेरियर डिझाईनर म्हणून काम करत असे. तर सिंह हे एग्झिक्यूटिव्ह शेफ होते.

एना आणि राजकुमार पॉयटर गॅल्टिझाईन यांची मुलगी असलेल्या मारिया यांचे 4 मे ला निधन झाले. 4 दिवसानंतर ह्यूस्टनमधील फॉरेस्ट पार्क वेस्टहेमर कब्रिस्तानामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

मारिया यांचा जन्म 1988 मध्ये लग्झमबर्ग येथे झाला होता. 5 वर्षांच्या असताना त्या रशियाला आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण बेल्जियममधून घेतले होते. त्या कामासाठी ब्रसेल्स, शिकागो, इलिनियोस आणि ह्युस्टन येथे राहत होत्या. त्यांना तीन बहिणी जेनिया, टटियाना आणि राजकुमारी अलेक्झेंड्रा व दिमित्री आणि लोएन हे दोन भाऊ आहेत.

Leave a Comment