आजच्या काळातील श्रावणबाळ, पालकांना सायकल रिक्षावर घेऊन 11 वर्षीय मुलाचा शेकडो किमी प्रवास

लॉकडाऊनमुळे आपल्या घरी पोहचण्यासाठी परप्रांतीय कामगारांना हजारो किमीची पायपीट करावी लागत आहे. या प्रवासात लहान मुलांचे हाल होत आहे. मात्र असे असले तरी हे कामगार आपल्या मुलांना खाद्यांवर घेऊन घरचा रस्ता धरत आहे. सोशल मीडियावर या कामगारांची व्यथा दर्शवणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामध्ये 11 वर्षांचा मुलगा आपल्या पालकांना घेऊन सायकल रिक्षा चालवत घरी चालल्याचे दिसत आहे.

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, या 11 वर्षीय मुलाचे नाव तवारे आलम आहे. हा मुलगा आपल्या पालकांना सायकल रिक्षामध्ये बसवून वाराणसीवरून बिहारच्या अरेरिया येथे चालला आहे. वडील रिक्षा चालवून थकल्यावर मुलगा त्यांची मदत करतो.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की कारचालक या मुलाला पाहून गाडी थांबवतात व त्याची चौकशी करतात. सोशल मीडियावर व्हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर युजर्स या मुलाला आजचा श्रावण बाळ म्हणत आहेत, तर काहीजण या मुलाच्या जिद्दीला सलाम करत आहेत.

Leave a Comment