पासवर्ड विसरला, फेसबुकने मागितले कुत्र्याचे ड्रायविंग लायसन्स

फोटो साभार पत्रिका

फेसबुकवर अनेक लोकांनी त्यांच्या पाळीव प्राण्यांची अकौंट उघडली आहेत आणि त्यावरून सतत काही पोस्ट टाकल्या जात असतात. ३३ वर्षीय एमिली त्यातीलच एक. तिने तिच्या पाळीव कुत्र्याचे म्हणजे मॅक्सचे फेसबुक अकौंट उघडले आहे. पण तिच्याकडून पासवर्ड हरवला किंवा तिला तो आठवेना तेव्हा तिने फेसबुकची मदत मागितली. फेसबुकने ती देऊ केली पण त्याबद्दल कुत्र्याच्या ड्रायव्हिंग लायसन्सची माहिती मागितल्याने एमिली आश्चर्यचकित झाली आहे.

घडले असे की एमिलीने तिच्या कुत्र्याचे फेसबुक अकौंट २०१० साली उघडले आहे. त्यासाठी तिने ठरविलेला पासवर्ड तिला आठवेना. आता असा पासवर्ड विसरला गेला किंवा आठवेना झाला तर तो रिकव्हर करणे किचकट काम आहे. स्टेटस अपडेट करताना पासवर्ड हवाच. एमिलीला तोच आठवेना. एमिली सतत मॅक्सचे फोटो, त्याची माहिती फेसबुकवर त्याच्या अकौंटवर शेअर करते. हे अकौंट उघडताना तिने मॅक्सचे स्टेटस सिंगल लिहिले होते. पण तिने मॅक्सचे लग्न लावून दिले आणि तिला त्याचे स्टेटस बदलायचे होते तेव्हा पासवर्ड आठवत नसल्याने ती हैराण झाली.

तिने या संदर्भात फेसबुकशी संपर्क साधून पासवर्ड रिकव्हर करण्यासाठी मदत मागितली. तेव्हा फेसबुकने मॅक्सचे ड्रायविंग लायसन्स मागितले. हैराण झालेल्या एमिलीला कुत्र्याचे लायसन्स आणायचे कसे हे समजेना तेव्हा तिने उत्तराचा स्क्रीन शॉट ट्विटरवर शेअर केला आणि कुत्र्याला कुणी ड्रायविंग शिकविणारे आहे काय म्हणजे त्याचे ड्रायविंग लायसंस् काढता येईल अशी टिपण्णी केली. त्यावर फेसबुक कडून तिला चोख उत्तर दिले आहे.

फेसबुकच्या म्हणण्यानुसार लोकांनी पाळीव प्राण्यांची फेसबुक अकौंट उघडू नयेत यासाठी हे केल्याचे सांगितले असून फेसबुक पाळीव प्राण्यांच्या अकौंटला परवानगी देत नाही असे सुनवले आहे.

Leave a Comment