‘बाहुबली’ कॅमेरा, 1 सेकंदात 70 लाख कोटी फोटो

स्मार्टफोन आणि डीएसएलआर कॅमेऱ्याद्वारे जास्तीत जास्त 1000 एफपीएसच्या (फ्रेम प्रति सेकंद) हिशोबाने फोटोग्राफी करता येते. आता वैज्ञानिकांनी एक असा कॅमेरा तयार केला आहे ज्याद्वारे 70 ट्रिलियन फ्रेम प्रति सेकंदच्या वेगाने फोटो काढता येतील. थोडक्यात, या अल्ट्रा फास्ट कॅमेऱ्याद्वारे एक क्षणात 70 लाख फोटो क्लिक करता येतील. या कॅमेऱ्याला कॅलिफोर्निया इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीचे संशोधक लिहाँग वँग यांनी तयार केले आहे.

या कॅमेऱ्याद्वारे मनुष्याचे फोटो नाही तर लाईट ट्रॅव्हलिंग वेब आणि मॉलिक्यूल डीके (अणुंचे विघटन) सारख्या नैसर्गिक घटनांना कैद करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. या कॅमेऱ्याचे अधिकृत नाव CUSP (कंप्रेस्ड अल्ट्राफास्ट स्पेक्ट्रल फोटोग्राफी) ठेवण्यात आले आहे. हा कॅमेरा प्रकाशाच्या गतीला एका सेंकदात 70 लाख कोटी फोटो क्लिक करत कैद करेल.

Image Credited – navbharattimes

70 लाख कोटी एफपीएस फोटो काढण्यासाठी हाय-स्पीड लेजरला ऑप्टिक्स आणि खास कॅमेऱ्यासोबत जोडण्यात आले आहे. हे खास ऑप्टिक्स लेजर लाईट वेगवेगळ्या फेम्टोसेंकद पल्सेसला अधिक लहान पल्सेसमध्ये बदलते. हे सर्व पल्स कॅमेऱ्याच्या आतील एक इमेज बनविण्याची क्षमता ठेवतात. कॅमेरा बनवणारे वँग म्हणाले की सीयूएसपीच्या मदतीने लाइफ सायन्स आणि मेटाफिजिक्स सारख्या दुसऱ्या क्षेत्रातील अनेक खास गोष्टींचा शोध लावता येईल. पृथ्वी आणि ब्रह्मांडात अल्ट्रा-फास्ट स्पीडमध्ये होणारे बदल देखील कैद करता येतील. कॅमेरा लाईट आणि वेब प्रोपेगेशन, न्यूक्लियर फ्यूजन, फोटॉन ट्रांसपोर्ट क्लाउड्स आणि बायॉलॉजिकल टिशूमध्ये वेगाने होणाऱ्या बदलांचे फोटो काढेल.

वँग यांनी याआधी देखील 10 ट्रिलियन प्रती सेंकदच्या फ्रेम रेटने फोटो काढणारा अल्ट्रा-फास्ट कॅमेरा तयार केला होता.

Leave a Comment