भाजपच्या माजी मंत्र्याने थेट चंद्रकांत पाटलांना लगावला टोला


मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे भाजपमधील नाराजी नाट्य आता जगासमोर येऊ लागले आहे. त्यातच आश्वासन देऊनही तिकीट न मिळालेल्या नाराज भाजप नेत्यांची यादी आता वाढतच चालली आहे. त्यात आता माजी मंत्री राम शिंदे यांचा देखील समावेश झाला आहे. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी राम शिंदे यांनी फेसबुक पोस्टचा आधार घेतला आहे. आपल्या फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या एका वक्तव्याचा आधार घेत टोला लगावला आहे.

रमेश कराड यांना पंकजा मुंडेंमुळे उमेदवारी मिळाली, पण राम शिंदे यांनी त्यांच्यासहित इतरांना संधी मिळाली नाही याची खंत व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी अहमदनगरच्या कर्जत जामखेड मतदारसंघात राम शिंदे यांचा पराभव केला. शिंदे यांनी पराभवानंतर त्यांच्याच पक्षातील राधाकृष्ण विखे पाटील यांना पराभवासाठी जबाबदार ठरवत जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

राम शिंदेंनी काय म्हटले आहे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये ?

Leave a Comment