5 लाखांपेक्षा कमी किंमतीत येत आहे ही शानदार इलेक्ट्रिक कार

स्ट्रोम मोटर्सने वर्ष 2018 मध्ये एंट्री लेव्हल कार स्ट्रोम आर3 सादर केली होती. ही कार मार्चमध्ये लाँच होणार होती, मात्र कोरोना व्हायरसमुळे लाँचिंग टाळण्यात आले होते. लवकरच या कारचे बुकिंग होण्याची शक्यता आहे. या कारची किंमत 4.50 लाख रुपये असू शकते. स्ट्रोम आर3 इलेक्ट्रिक कारमध्ये 2 सीट आहेत. ही थ्रीव्हिल कार असून, याची लांबी 2,907 mm, रुंदी 1,450 mm, उंची 1,572 mm आणि ग्राउंड क्लिअरेंस 185 mm आहे. तर कारचे वजन 550 किलो आहे.

स्ट्रोम आर3 ला पुढे दोन एलॉय व्हिल्ज आणि पाठीमागे एक स्टील व्हिल आहे. कारचे व्हिल्ज 13-इंचचे आहेत. ही छोटी इलेक्ट्रिक कार मस्क्युलर फ्रंट बंपर, एलईडी लाइट्स, रियर स्पॉइलर आणि ड्यूल-टोन कलर सोबत येते. खास गोष्ट म्हणजे यात सनरूफ देखील मिळेल.

Image Credited – navbharattimes

स्ट्रोम आर3 मध् ड्यूल-टोन डॅशबोर्ड, 3-स्पोक स्टेअरिंग व्हिल, 4.3-इंच टचस्क्रीन डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि 12-पद्धतीने एडजस्टेबल ड्राइव्हर सीट देण्यात आली आहे. कारमध्ये पॉवर विंडो, क्लाइमेट कंट्रोल, रिमोट कीलेस एंट्री आणि 3-पॉइंट सीटबेल्ट सारखे फीचर्स मिळतील. यात 7.0-इंचचे टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जे आयओटी-इनेबल्ड कंटिन्यूअस मॉनिटरिंग सिस्टमसोबत येते. या टचस्क्रीनमध्ये 4जी कनेक्टिविटी, वॉइस कंट्रोल, जेस्चर कंट्रोल, 20 जीबी ऑनबोर्ड म्यूझिक स्टोरेज, स्मार्ट म्यूझिक प्लेलिस्ट, मोबाईल कनेक्टिविटी आणि वॉइस सोबत टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सारख्या सुविधा मिळतील.

Image Credited – navbharattimes

या इलेक्ट्रिक कारमध्ये लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. यात देण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटर 20 बीएचपी पॉवर आणि 90 एनएम टॉर्क जनरेट करते. कारमध्ये इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स असे तीन ड्राईव्हिंग मोड्स आहेत. कारमध्ये रिजेनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम देखील आहे.

Image Credited – navbharattimes

ही कार हाय- स्ट्रेंथ स्टील स्पेस फ्रेमवर आधारित आहे. यात फ्रंटला 2 हाइड्रोलिक डिस्क ब्रेक आणि रियरमध्ये ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. कंपनीचा दावा आहे की एकदा फूल चार्ज केल्यावर कार 200 किमी अंतर पार करू शकते. याचा टॉप स्पीड ताशी 80 किमी आहे. 3 तासात बॅटरी फुलचार्ज होईल.

Leave a Comment