पोस्टमन बनले ‘देवदूत’, घरपोच पोहचवले 1000 कोटी रुपये

50 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये भारतीय बँकिंग सिस्टमने एक नवीन विक्रम केला आहे. वेगवेगळ्या बँकांनी पोस्टमनच्या मार्फत खातेधारकांच्या घरापर्यंत 1000 कोटी रुपये रोख रक्कम पोहचवली आहे. ही रक्कम लॉकडाऊनच्या काळातील पोस्ट ऑफिस सेविंग्स बँक अकाउंटच्या 66000 कोटी रुपयांपेक्षा वेगळी आहे.

ग्राहकांना घरापर्यंत रोख रक्कम पोहचविण्याच्या बाबतीत उत्तर प्रदेश आणि बिहार पोस्टल सर्कल सर्वात पुढे आहे. या दोन्ही राज्यांमध्ये क्रमशः 274 कोटी आणि 101 कोटी ग्राहकांपर्यंत पोहचवले आहेत. यापाठोपाठ गुजरात, तेलंगाना आणि आंध्र प्रदेश हे राज्य आहेत.

23 मार्च ते 11 मे दरम्यान 59 लाख ट्रांझक्शन अंतर्गत 1051 कोटी रुपये खातेधारकांच्या घरापर्यंत पोहचवण्यात आले. कॉन्टेंनमेंट झोन, निर्वासित कँप आणि हॉटस्पॉट भागात ही रक्कम पोहचवण्यात आली आहे. यातील 20 लाख व्यवहार हा आधार आधारित पेमेंट सिस्टमद्वारे करण्यात आले असून, यातील एक तृतियांश व्यवहार उत्तर प्रदेशमधील आहे.

2 लाखांपेक्षा अधिक पोस्टमन लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना घरपोच रक्कम पोहचवत आहेत. या कामासाठी 1.36 लाख पोस्ट ऑफिस आणि 1.86 आधार आधारित पेमेंट सिस्टम डिव्हाईसचा वापर केला आहे.

Leave a Comment