वाढदिवसानिमित्ताने जाणून घ्या मार्क झुकरबर्ग विषयी काही खास गोष्टी

जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गचा आज 36वा वाढदिवस आहे. मार्क झुकरबर्गचा जन्म 14 मे 1984 ला अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील डाब्स फेरी येथे झाला आहे. त्याचे पुर्ण नाव मार्क इलिएट झुकरबर्ग आहे. तर वडिलांचे नाव एडवर्ड आणि आईचे नाव करेन कँपर आहे. त्याचे आई-वडिल दोघेही सायकेट्रिस्ट आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.

मार्कला लहानपणापासूनच कॉम्प्युटरची आवड होती. त्याने लहान असतानाच एक मेसेजिंग प्रोग्राम बनवला होता. ज्याचा उपयोग त्याचे वडील डेंटल ऑफिसमध्ये करत असे. हायस्कूलमध्ये शिकत असताना त्याला मायक्रोसॉफ्ट आणि एओएल सारख्या दिग्गज कंपन्यांकडून नोकरीची ऑफर मिळाली होती.

मार्कने 17 वर्षांचा असताना एक सिनेप्स मीडिया प्लेयर तयार केला होता. ज्यात युजर्स आपल्या आवडीचे गाणे स्टोर करू शकत होते. यूनिव्हर्सिटीमध्ये शिकताना मार्कने फेसमॅश नावाची साईट लाँच केली होती, मात्र ही साईट काही खास कमाल करू शकली नाही.

2004 साली त्याने आपल्या मित्रांसोबत मिळून फेसबुकची सुरूवात केली व 2004 अखेरपर्यंत फेसबुकशी 1 मिलियन युजर्स जोडले गेले होते. वयाच्या 23व्या वर्षीच तो अब्जाधीश झाला होता. 2005 मध्ये वेंचर कॅपिटल एक्सेलने फेसबुकमध्ये 12.7 मिलियन डॉलरची गुंतवणूक केली होती. 2010 मध्ये टाईम मॅग्झिनने ‘पर्सन ऑफ द ईयर’ आणि फॉर्ब्सने त्याचा जगातील शक्तिशाली लोकांच्या यादीत समावेश केला होता. ऑगस्ट 2019 मध्ये त्याची एकूण संपत्ती 68.2 बिलियन डॉलर होती.

Leave a Comment