इराणच्या चलनात मोठी घसरण, एका डॉलरसाठी मोजावे लागत आहेत इतके लाख रियाल

कोरोना व्हायरस महामारीचा सर्वाधिक फटका मध्य पुर्वेतील इराणला बसला आहे. महामारीमुळे तेलाची कमी खपत आणि अमेरिकेच्या निर्बंधमामुळे इरणाच्या चलनात मोठी घसरण झाली आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत इराणचे चलन रियाल खूपच खाली घसरले आहे. फॉरेंन एक्सचेंज वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, अनाधिकृत बाजारात इराणच्या चलनात सप्टेंबर 2018 नंतर सर्वाधिक घसरण झाली आहे.

वेबसाइट बॉनबास्ट.कॉमनुसार, एका अमेरिकन डॉलरसाठी 1,70,000 रियाल द्यावे लागत आहेत. मात्र इराणच्या केंद्रीय बँकेच्या वेबसाइटनुसार अधिकृत बाजारात एका डॉलरची किंमत 42,000 रियाल आहे. अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांमुळे इराणला दुसऱ्या देशांना तेल विकणे अवघड झाले आहे. भारताने देखील जवळपास इराणकडून तेल घेणे बंद केले आहे.

इराणचे उपराष्ट्रपती एशाक जहांगिरी म्हणाले की, अमेरिकेचे निर्बंध, महामारी, तेलाच्या किंमतीत घसरण आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील सुस्ती या गोष्टीमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेला मोठा धोका निर्माण झाला आहे.

Leave a Comment