फेसबुककडून डेटा मागण्यात भारत दुसऱ्या स्थानी, 2019 मध्ये मागितला इतक्या हजार लोकांचा डेटा

जागतिक स्तरावर सरकारने फेसबुककडून युजरचा डेटा मागण्याचे प्रमाण 9.5 टक्क्यांनी वाढले आहे. हा डेटा जुलै ते डिसेंबर 2019 मधील आहे. अमेरिकेनंतर भारत सरकारने फेसबुककडून सर्वाधिक युजर्सचा डेटा मागितला. फेसबुकच्या रिपोर्टनुसार भारताकडून 39,664 अकाउंट्ससाठी 26,698 वेळा विनंती करण्यात आली. तर 57 टक्के प्रकरणात फेसबुकने सरकारला डेटा दिला.

अमेरिका फेसबुककडून युजर्सचा डेटा मागण्याच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. फेसबुकच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेने 82,321 युजर्सच्या अकाउंट्ससाठी फेसबुकला 51,121 वेळा रिक्वेस्ट करण्यात आली. कंपनीने 88 टक्के डेटा सरकारला दिला.

2019 मध्ये मागील 6 महिन्यात जगभरात फेसबुककडून डेटा मागण्याचे प्रमाण 9.5 टक्क्यांनी वाढले आहे. ही संख्या आधी 1,28,617 होती जी आता 1,40,875 झाली आहे. अमेरिका आणि भारतानंतर डेटा मागणाऱ्या देशांमध्ये ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स आणि इटली या देशांचा देखील समावेश आहे.

फेसबुकने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, सरकारद्वारे युजर्सच्या डेटासाठी करण्यात आलेली विनंती आम्ही तपासतो. हे वैध आहे का ते सुनिश्चित करतो. जर एखादी विनंती अर्धवट वापत असल्यास आम्ही नाकारतो व न्यायालयात त्या विरोधात लढतो. कंपनी सरकारला अनाधिकृतरित्या युजर्सचा डेटा देत नाही.

Leave a Comment