येथे पीपीई सुट घालून केस कापत आहे न्हावी

कोरोना व्हायरस महामारीने आपल्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम केला आहे. केस कापण्यापासून ते वस्तू खरेदीपर्यंत अशा अनेक गोष्टीत कोरोनाची भिती दिसत आहे. याचाच एक प्रकार गुजरातच्या नडियाद येथे पाहण्यास मिळाला. कोरोना संसर्गपासून वाचण्यासाठी येथील एका सलूनमध्ये कर्मचारी पीपीई सूट घालून केस कापत आहेत.

गुजरातचे नडियाद ग्रीन झोनमध्ये असल्याने येथे सलून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी येथील नागरिक विशेष खबरदारी घेत आहेत. याचाच एक भाग म्हणून येथील एका सलून मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांना डॉक्टर कोरोनाग्रस्तांचा उपचार करण्यासाठी जो पीपीई सूट घालतात, तो घालण्यास सांगितला आहे. येथे येणाऱ्या ग्राहकाला सर्वात प्रथम सॅनिटायझ केले जाते. हात सॅनिटायझरने स्वच्छ केल्यानंतर खुर्चीवर बसण्याआधी मोजे डिस्पोसेबल सॉक्स पायात घालण्यास सांगितले जाते.

एका डिस्पोसेबल कपड्याने पुर्ण शरीर झाकले जाते. केस कापल्यानंतर सॉक्स आणि कपडे डिस्पोज केले जातात व नवीन ग्राहकांना नवीन सेट घालण्यास दिला जातो. कर्मचाऱ्यांनी घातलेले पीपीई किट देखील रोज बदलले जाते. ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेत हे सलून आपल्या व्यवसाय सुरू ठेवत आहे.

Leave a Comment