ट्रम्प यांच्या मैत्री खातीर ही कंपनी सर्वात प्रथम अमेरिकेला देणार कोरोनावरील लस

फ्रान्सची औषध कंपनी सॅनोफीने कोरोनाची लस सर्वात प्रथम अमेरिकाला देणार असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे या कंपनीत शेअर असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच सॅनोफीने सर्वात प्रथम अमेरिकेला लस देणार असल्याचे म्हटले आहे.

सॅनोफी कंपनीचे सीईओ पॉल हडसन हे ब्लूमबर्ग न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले होते की, अमेरिकेने कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे त्यांचा अधिकार आहे की आमच्या कंपनीद्वारे बनविण्यात येणारी कोरोना लस त्यांना प्रथम देण्यात यावी. अमेरिकेने सॅनोफीमध्ये फेब्रुवारीमध्येच गुंतवणूक केली होती व लसीसाठी प्री-ऑर्डर देखील दिले आहे.

जगभरात कोरोना लसीवर काम करणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी सॅनोफी एक आहे. सॅनोफीने ग्लॅक्सोस्मिथक्लाइन कंपनीसोबत वर्षाला 60 कोटी लस निर्मिती करण्यासाठी करार केला आहे. ट्रम्प प्रशासन कोरोना लसीच्या संशोधनासाठी ऑपरेशन वार्प स्पीड अंतर्गत अनेक औषध कंपन्यांना निधी देत आहे. अमेरिकेच्या बायोमेडिकल एडवांस्ड रिसर्च अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने सॅनोफीला कोरोना लसीवर काम करण्यासाठी जवळपास 226 कोटी रुपये निधी दिला आहे. अमेरिकेने मागील वर्षी डिसेंबरमध्ये इंफ्लुएंजावरील लस शोधण्यासाठी सॅनोफीला 1700 कोटी रुपये दिले होते.

द न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांचे शेअर असलेली सॅनोफी कंपनी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधाला प्लाकेनिल ब्राँडच्या नावाने बाजारात विकते.

Leave a Comment