फेसबुकसाठी हे काम केल्यास मिळणार 77 लाख

सोशल मीडियावर वादग्रस्त मेसेज पसरवून धार्मिक, सामाजिक तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न केला जातो. असे संदेश रोखण्यासाठी सोशल मीडिया कंपनी फेसबुक वेगवेगळे पावले उचलत आहे. अशा हिंसक मेसेज, व्हिडीओ फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मवरून त्वरित हटवत असते. मात्र या प्लॅटफॉर्मवर हिंसक मेसेज पसरवणारे मीम्स थांबत नाहीत. हे मीम्स थांबविण्यासाठी आता फेसबुकने डेव्हलपर्ससाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे.

ही स्पर्धा जिंकणाऱ्याला 1 लाख डॉलर (77 लाख रुपये) फेसबुककडून देण्यात येणार आहे. डेव्हलपर्सला डाटा देण्यासाठी फेसबुककडे स्वतःचा डेटाबेस आहे. या प्रोजेक्टचा उद्देश वेगवेगळे फोटो एनालिसिस करून त्याचे वर्गीकरण करणे आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंसद्वारे कोणते मीम्स हिंसा पसरवणारे आहेत, याचा शोध घेतला जाईल. डेव्हलपर्सला हिंसक मीम्स शोधण्यासाठी खास टूल तयार करावे लागेल.

ड्रिवनडेटा टीमसोबत मिळून या स्पर्धेचे आयोजन केले जाईल. यात डाटा सायंटिस्ट भाग घेतील. जी टीम कोड क्रॅक करेल, त्या टीमला 77 लाख रुपये बक्षीस मिळेल. यासाठी drivendata.org वेबसाईटवर जाऊन सहभागी होता येईल.

Leave a Comment