नोकरीवरून काढले म्हणून चिरडली ‘फेरारी’

एका वॉल्वो ट्रकचा फेरारी जीटीसी4लुसोला चिरडल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिपोर्टनुसार नोकरीवरून काढले म्हणून बदला घेण्यासाठी कर्मचाऱ्याने मालकाची फेरारी चिरडली. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दिसत आहे की, पांढऱ्या वॉल्वो ट्रकने फेरारीला चिरडले असून, यात फेरारीच्या बोनेटचा चुराडा झाला आहे. नेटकरी यामागे वेगवेगळी कारणे सांगत आहेत.

Truck vs Ferrari

एका अकाउंटनुसार, कर्मचाऱ्याला ड्रग चाचणी करावी लागली व नवीन ट्रक न मिळाल्याने त्याने हे पाऊल उचलले. त्याने आधी मालकाला पार्क केलेली फेरारी त्याची आहे का असे विचारले व त्यानंतर ट्रक गाडीवर चढवली.

आणखी एका फेसबुक अकाउंटनुसार, त्याला नवीन ट्रक देण्याचे वचन न पाळल्यामुळे त्याने असे टोकाचे पाऊल उचलले. तर त्याची कामगिरी चांगली नसल्याने हे मालकाबरोबर वादाचे कारण ठरल्याचे काहींनी सांगितले.

Leave a Comment