25 रुपयात बीएसएनएल देणार वाय-फाय इंटरनेट

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल देशभरातील गाव आणि शहरांमध्ये वाय-फाय सेवा सुरू करणार आहे. एका मर्यादेपर्यंत बीएसएनएलची वाय-फाय सेवा मोफत वापरता येणार असून, वाराणसीमधून बीएसएनएल वाय-फाय हॉटस्पॉटची सुरूवात होणार आहे.

असे वापरा बीएसएनएल वाय-फाय –

बीएसएनएलच्या हाय-स्पीड इंटरनेटचा वापर करण्यासाठी फोनमधील वाय-फाय सुरू करावा लागेल. त्यानंतर बीएसएनएल वाय-फाय नेटवर्कशी कनेक्ट करावे लागेल. मोबाईल नंबर टाकल्यानंत 6 आकडी पिन मिळेल. हा पिन टाकल्यानंतर वाय-फायचा वापर करता येईल.

नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, बीएसएनएल वाय-फाय कनेक्ट केल्यानंतर युजर केवळ 30 मिनिटे या सेवेचा मोफत वापर करू शकतील. अधिक डेटा वापरण्यासाठी कंपनीचे कूपन खरेदी करावे लागेल. ग्रामीण भागात 25 रुपये, 45 रुपये आणि 150 रुपयांचे कूपन उपलब्ध असेल. 25 रुपयांमध्ये 7 दिवसांच्या वैधतेत 2जीबी डेटा मिळेल. 150 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी 28 जीबी डेटा मिळेल.

शहरी भागांसाठी 17 प्लॅन आहेत. हे प्लॅन 10 रुपयांपासून ते 1999 रुपयांपर्यंत आहेत. 1999 रुपयांमध्ये 28 दिवसात 160 जीबी डेटा मिळेल.

Leave a Comment