वनप्लस ८ ची मेड इन इंडिया सिरीज मे अखेरी येणार

भारतात वनप्लस ८ सिरीज लाँच करण्याची तयारी जोरात सुरु असून या सिरीजची खासियत म्हणजे ही सिरीज मेड इन इंडिया असेल. नोइडा येथील कारखान्यात या फोनचे उत्पादन सुरु असून मे महिन्याच्या अखेरी हे फोन भारतात उपलब्ध होतील असे जनरल मॅनेजर विकास अग्रवाल यांनी सूचित केले आहे. हा फोन गेल्या महिन्यात लाँच झाला असला तरी भारतात लॉक डाऊन मुळे तो उपलब्ध झालेला नाही.

 

लॉकडाऊन मधून काही सवलती मिळाल्याबरोबर कंपनीने स्मार्टफोन साठी डोअर स्टेप रिपेअरिंग सुरु केले असून १८ शहरात ग्राहक सेवा केंद्रे सुरु केली आहेत. वनप्लस ८ सिरीजला जगभरात चांगला प्रतिसाद मिळाला असून भारतात ६ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज व्हेरीयंट साठी ४१९९९ रुपये मोजावे लागणार आहेत. ८ जीबी, १२८ जीबी स्टोरेजसाठी ४४९९९ तर १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसाठी ५९९९९ रुपये मोजावे लागणार आहेत. प्लस बुलेट वायरलेस साठी आणखी १९९० रुपये द्यावे लागतील.

 

या फोनसाठी फ्रंटला पंचहॉल डिस्प्ले आणि फ्रंट कॅमेरा असून वनप्लस ८ प्रो पाणी आणि डस्ट प्रूफ आहे. त्याला ६.७८ इंची क्यूएचडी स्क्रीन दिला गेला आहे.

Leave a Comment