लॉकडाऊन स्पेशल डेल्गोना कॉफीचा घरीच घ्या आस्वाद

फोटो साभार  यु ट्यूब  करोना मुळे लागू झालेल्या लॉकडाऊन मुळे लोक घरात बंद आहेत आणि अश्यावेळी कॅफे कॉफीडे चे प्रेमी किंवा एकंदर कॉफी प्रेमी थोडे वैतागले आहेत कारण कॉफी शॉप बंद आहेत. गेल्या काही दिवसात लॉक डाऊन स्पेशल किंवा क्वारंटाईन स्पेशल म्हणून डेल्गोना कॉफी जगभरात व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे ही कॉफी घराच्या घरी बनविता येत असल्याने अनेकांनी डेल्गोना कॉफी चॅलेंज स्वीकारून त्याचे मस्त फोटो शेअर केले आहेत.

 

सर्वात महत्वाचे म्हणजे या टेस्टी कॉफी साठी लागणारे सर्व पदार्थ घरात उपलब्ध असतात. पाच मुख्य पदार्थ त्यासाठी लागतात. ते म्हणजे कॉफी पावडर, गरम पाणी, दुध मलाई, साखर आणि बर्फ. फेसबुक, व्हॉटस अप, इन्स्टाग्रामवर या कॉफीचे अनेक फोटो शेअर केले गेले आहेत. ही कॉफी मुळची द. कोरियाची असून इन्स्टन्ट एनर्जी देणारी आहे.

ती तयार करायची कृती अशी. प्रथम एका बाउल मध्ये तीन चमचे कॉफी, तीन चमचे साखर, ३ चमचे गरम पाणी घालून भरपूर फेटायचे. त्यात दुधाची मलाई घालू शकता. हँड ब्लेंडरच्या मदतीनेही फेटू शकता. हे सर्व मिश्रण दाट झाले की ग्लास मध्ये थंड दुध, त्यात बर्फाचे तुकडे घालून चमच्याने वर हे कॉफीचे मलाईदार मिश्रण घालायचे आणि मस्त कॉफीचा आस्वाद घ्यायचा.

 

ही कॉफी पित्तशामक आहे आणि तिच्या सेवनाने वजन कमी होते असाही दावा केला जातो. तसेच ही कॉफी त्वरित एनर्जी देणारी आणि थकवा दूर करणारी आहे असेही सांगितले जाते.

Leave a Comment