भारत-चीन सीमेवर आहे एलियन्सचे विमानतळ?

परग्रहवासी म्हणजे एलियन्स खरोखर अस्तित्वात आहेत का नाहीत यावर दीर्घ काळ संशोधन सुरु आहे पण आजपर्यंत या बाबत नक्की कुणीच सांगू शकलेले नाही. काही वर्षापूर्वी एनदर्स सेंटबर्ग, एरिक ड्रेक्सलर आणि टॉड ऑर्ड या तीन वैज्ञानिकांनी ब्रह्मांडात माणूस जातीशिवाय दुसरा बुद्धिमान प्राणी नाही असे म्हटले होते मात्र तरीही एलीयन्स वरील संशोधन सुरु राहिले पाहिजे असेही मत व्यक्त केले होते. काही असले तरी एलियन्सबाबतची चर्चा सुरूच राहते.

 

भारत चीन सीमेवरील कोन्ग्का ला या भागात एलियन्सचा विमानतळ आहे असे मानले जाते. हा भाग चीनने अक्साई चीन म्हणून जाहीर केलेला आहे तर भारताच्या म्हणण्याप्रमाणे तो लदाखचा भाग आहे. दोन्ही देशातील करारानुसार येथे सैनिक गस्त घालत नाहीत आणि सर्वसामान्य माणसाना येथे जाण्यास बंदी केली गेली आहे.

या ठिकाणी अनेकदा युएफओ म्हणजे उडत्या तबकड्या पाहिल्याचा दावा केला जातो. तसे जगात अनेक ठिकाणी अश्या उडत्या तबकड्या पाहिल्याचे दावे केले जातात मात्र या भागात हे प्रमाण अधिक आहे. येथील स्थानिक अनेकदा येथील पहाडावरून उडत्या तबकड्या जाताना दिसतात असे सांगतात आणि त्यांचे काही फोटोही प्रसिद्ध केले गेले आहेत. त्यामुळे हा भाग एलियन्सचा हॉटस्पॉट मानला जातो.

 

२००६ मध्ये काही भारतीय वैज्ञानिकांनी येथे संशोधन केले तेव्हा त्यांनी रोबोट सारख्या आकृत्या पाहिल्याचे पण काही क्षणात त्या गुप्त झाल्याचे सांगितले होते. २०१२ मध्ये लडाखच्या पेंगोग लेकवरूनही एक उडणारी वस्तू वेगाने गेल्याचे नोंदले गेले होते. लडाखच्या धमचौकाजवळ लागनखेल तेथेही उडत्या तबकड्या पाहिल्याचा दावा केला जात होता पण नंतर ते चीनचे गस्ती यंत्र होते आणि ते मधूनच दिसायचे आणि मधूनच गायब व्हायचे, त्यातून पिवळा प्रकाश दिसत होता असा खुलासा करण्यात आला होता.

Leave a Comment