टीव्ही सिरीयल शुटींग होणार सुरु

नवीन मार्गदर्शक तत्वानुसार टीव्ही सिरीयलचे शुटींग लवकरच सुरु होणार असल्याची खुशखबरी टीवी सिरीयल प्रेमींसाठी आली आहे. कोविड १९ मुळे राज्यात लॉकडाऊन सुरु असल्याने बॉलीवूड चित्रपट तसेच टीव्ही मालिकांचे शुटींग गेले जवळ जवळ दीड महिना बंद आहे. आता मात्र नवीन एपिसोडचे शुटींग सुरु होत असल्याचे फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयचे अध्यक्ष बी. एन तिवारी यांनी एका वेबसाईटला सांगितले आहे.

 

यासाठी सरकारने नवीन मार्गदर्शक तत्वे लागू केली आहेत ती पाळून शुटींग सुरु केले जाणार आहे. त्यात एकता कपूरच्या भाभीजी घर पर है, सोनीच्या रियालिटी शो आणि केबीसीच्या शुटींग चा समावेश आहे. यासाठी दैनिक कर्मचारी आणि निर्माते यांना काही अटी पाळाव्या लागणार आहेत. आता करोना सह जगणे आवश्यक बनल्याने आणि करोनाची लस लवकर येण्याची शक्यता नसल्याने सर्वाना मास्क वापरणे, सॅनीटायझर वापरणे बंधनकारक असून त्याची नीट अंमलबजावणी होते वा नाही हे पाहण्यासाठी एक सुपरवायझर नेमावा लागणार आहे.

 

करोना मुळे दुर्दैवाने कोणाचा मृत्यू ओढवला तर संबंधित वाहिनी आणि निर्मात्याला त्या वर्करच्या कुटुंबाला ५० लाखपर्यंत नुकसान भरपाई द्यावी लागेल शिवाय वैद्यकीय खर्च करावा लागणार आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार आजपर्यंत कुणाचा अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला ४० लाखापर्यंत मदत दिली जात होतीच पण करोना मृत्यू साठी ही रक्कम ५० लाख रुपये ठरविली गेली आहे. आजपर्यंत सेटवर १०० हून अधिक लोक हजर असत आता मात्र ५० टक्के लोकांनाच एकावेळी परवानगी असेल आणि शिफ्ट मध्ये काम केले जाईल. ५० वर्षाच्या पुढच्या कर्मचाऱ्यांना आणखी तीन महिने घरीच राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.

Leave a Comment