ट्विटरची कर्मचाऱ्यांना ‘कायमस्वरूपी’ घरून काम करण्याची मूभा

कोरोना व्हायरसमुळे अनेक दिग्गज टेक कंपन्यांची कर्मचारी मागील दीड महिन्यांपासून घरून काम करत आहे. आता ट्विटरने म्हटले आहे की, कोरोना व्हायरस लॉकडाऊन समाप्त झाल्यानंतर देखील कर्मचारी त्यांना हवे असल्यास कायमस्वरूपी घरून काम करू शकतात. तसेच सप्टेंबर आधी कार्यालय उघडण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. मार्च महिन्यात कंपनीने वर्क फ्रॉम होमची सुरूवात केली होती.

ट्विटरच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, कामाचे विकेंद्रीकरण करून,  कर्मचाऱ्यांना कोठूनही काम करता येईल, याच्यावर आमचा जोर आहे. अशाप्रकारे काम करणे शक्य असल्याचे मागील काही आठवड्यात सिद्ध झाले आहे. जर कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरून काम करायचे असल्यास, ते करू शकतात.

कंपनीने सांगितले की, कार्यालय सुरू करण्याचा निर्णय हा आमचा असेल. कर्मचाऱ्यांना जर कार्यालयात यायचे असेल तर त्यांच्यासाठी आम्ही नेहमीच तेथे असू. तसेच सप्टेंबर आधी कार्यालय उघडण्याची शक्यता कमी आहे.

दरम्यान, गुगल आणि फेसबुक देखील आपल्या कर्मचाऱ्यांना या वर्षाअखेर घरून काम करण्यास सांगू शकतात.

Leave a Comment