लाखो कामगार रिक्षाने हजारो किमीचा प्रवास करत निघाले घरी

लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, विरार, नवी मुंबई अशा विविध भागात अडकलेले परप्रांतीय कामगारांनी घरी जाण्याचा मार्ग निवडला आहे. सरकारने या कामगारांसाठी स्पेशल रेल्वेची सोय केली असताना देखील हे कामगार स्वतः पायी अथवा गाडीने घरी निघाले आहेत.

अमर उजालाच्या वृत्तानुसार, या शहरांमधून जवळपास 1 लाख रिक्षाचालकांनी घरी जाण्यासाठी 1500 ते 2000 किमीच्या प्रवासाला सुरूवात केली आहे. प्रत्येक रिक्षामध्ये कमीत कमी 4 प्रवासी आहेत. त्यांचे म्हणणे आहे की लॉकडाऊन सुरू होऊन दोन महिने झाले आहेत, अजून वाट पाहू शकत नाही. जवळील पैसे समाप्त होत चालले  असल्याने रिक्षाद्वारे घरी जाण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकांश रिक्षाचालक हे उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड येथील आहेत.

यातील एका रिक्षाचालकाने सांगितले की, ते आपली दोन मुले, वृद्ध आई आणि पत्नीसह नवी मुंबई येथे राहत होते. मात्र लॉकडाऊनमुळे ते अडकले होते. त्यामुळे त्यांनी कुटुंबासोबत आपल्या घरी वाराणसी येथे जाण्याचा निर्णय घेतला. नवी मुंबईवरून वाराणसी 1700 किमी लांब आहे.

त्याने सांगितले की, या पुर्ण प्रवासात 7 ते 8 हजार रुपये पेट्रोल खर्च येईल. एका दिवसात 300 ते 400 किमी अंतर कापले जाते. मात्र गर्मीमुळे रिक्षामध्ये समस्या येत आहे. नवी मुंबईतील एका पक्षाने जेवणाची सोय केली होती, मात्र ते पुरेसे नव्हते. प्रवासात लोकांनी जे जेवण मिळत आहे, त्यावरच पोट भरत आहोत.

अन्य एका रिक्षा चालकाने सांगितले की, लोक बाईक, सायकल, हातगाडी जे भेटेल त्याने घरी चालले आहेत.

Leave a Comment