गुगल सर्चमध्ये मोदींच्या ‘आत्मनिर्भर’चीच चर्चा


नवी दिल्ली – काल देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत आणण्यासाठी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची केली. त्याचबरोबर देशाला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी आर्थिक सुधारणा वेगाने लागू करण्यात येतील आणि लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याचे स्वरूप नवे असेल, असे स्पष्ट केले.

पण देशाला संबोधित करताना त्यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ होण्याची गरज असल्याचे म्हटले होते. मोदींनी आपल्या भाषणामध्ये अनेकवेळा आत्मनिर्भर या शब्दाचा उच्चार केला. पण सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलवर भारतीयांनी आत्मनिर्भर या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवात केल्यापासून चौथ्या मिनिटाला पहिल्यांदा आत्मनिर्भर हा शब्द वापरला. २१ व्या शतकामध्ये आत्मनिर्भर भारत हा एकमेव उपाय असल्याचे मोदी म्हणाले. गुगलवर तेव्हापासून आत्मनिर्भर या शब्दासंदर्भातील सर्व सर्वाधिक वाढल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मागील १२ तासांमध्ये या शब्दाचा अर्थ जाणून घेण्यासाठी कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, तेलंगणा, दिल्ली या पाच राज्यांमधील लोकांनी सर्वाधिक प्रयत्न केल्याचे गुगल ट्रेण्डसवरुन दिसून येत आहे.

आत्मनिर्भर या शब्दाचा उल्लेख नरेंद्र मोदींनी केल्यानंतर १५ मिनिटांच्या आत हा शब्द सर्वाधिक सर्च झाल्याचे गुगल ट्रेण्डवरुन दिसून येते. ज्यावेळी मोदी देशाला संबोधित करत होते त्या दरम्यानच भारतीयांनी आत्मनिर्भर या शब्दाचा अर्थ जाणून घेण्यासाठी गुगलचा सर्वाधिक वापर केला.

आत्मनिर्भर या शब्दाचा अर्थ जाणून घेणाऱ्यांमध्ये सर्वाधिक दक्षिण भारतामधील राज्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्याचबरोबर या शब्दाचा अर्थ जाणून घेणाऱ्यांच्या यादीत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी असल्याचे गुगल ट्रेण्ड्सवरुन स्पष्ट होत आहे. तर पहिल्यास्थानी कर्नाटकमधून असून त्या खालोखाल दुसऱ्या क्रमाकांवर गोवा, तिसऱ्यावर महाराष्ट्र, चौथ्यावर तेलंगणा तर पाचव्यास्थानी राजधानी दिल्ली असल्याचे गुगल ट्रेण्ड्सवरुन स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर हा शब्द सर्वाधिक वेळा सर्च करणाऱ्या राज्यांच्या यादीत उत्तराखंड, गुजरात, हरियाणा, छत्तीसगड, झारखंड, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब, बिहार, केरळ, आसाम, पश्चिम बंगाल आणि ओदिशा या राज्यांचा क्रमांक लागतो.

यात उल्लेखनीय बाब अशी आहे की हा हिंदी शब्द आंध्र प्रदेश, केरळ, पंजाब, आसाम आणि पश्चिम बंगाल या हिंदी पट्ट्यातील राज्यांपेक्षा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या दोन प्रमुख राज्यांमध्ये अधिक जणांनी सर्च केला. त्याचबरोबर मोदी वापरत असलेली हिंदी दक्षिण भारतालाच काय तर हिंदी पट्ट्यातील राज्यांनाही समजणार नाही अशी टीका नेटकऱ्यांनीही ट्विटवरुन केल्याचे पहायला मिळाले.

Leave a Comment