या 113 वर्षीय आजीबाईंनी अशी केली कोरोनावर मात

जगभरात कोरोनाग्रस्तांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असताना, दुसरीकडे रुग्ण बरे होण्याची संख्या देखील वाढत आहे. आता स्पेनमधील 113 वर्षीय वृद्ध महिला कोरोनातून बऱ्या झाल्या आहेत. त्या स्पेनमधील सर्वात वृद्ध महिला असल्याचे सांगितले जाते. अमेरिकेत जन्म झालेल्या मारिया ब्रॅन्यस यांना एप्रिलमध्ये ओलट शहरातील सांता मारिया डेल तुरा केअर होममध्ये असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तेथे त्या मागील 20 वर्षांपासून राहत आहेत.

तेथील प्रवक्त्यांनी सांगितले की, त्या आजारातून बऱ्या झाल्या असून आता व्यवस्थित आहेत. मागील आठवड्यात त्यांनी चाचणी केली होती व रिपोर्ट नेगेटिव्ह आला होता. मारिया यांनी स्वतःला अनेक आठवडे आयसोलेट केले होते व एकच कर्मचारी त्यांची तपासणी करण्यास येत असे.

या केअर होममध्ये कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. 4 मार्च 1907 ला सॅन फ्रॅन्सिस्को येथे जन्म झालेल्या मारिया प्रथम विश्वयुद्धाच्या काळात स्पेनमध्ये स्थायिक झाल्या होत्या. 1918-19 मध्ये स्पॅनिश प्लू महामारीमध्ये देखील त्यांनी मात केली होती.

Leave a Comment