… म्हणून तब्बल 55 दिवस दिल्ली विमानतळावर राहिली ही व्यक्ती

टॉम हँक्सच्या चाहत्यांना कदाचित 2004 चा ‘द टर्मिनल’ हा चित्रपट आठवत असेल. या चित्रपटात त्याला पासपोर्ट अवैध झाल्यानंतर विमानतळावर राहायला भाग पाडण्यात आले होते. अशीच काहीशी घटना एका जर्मनी व्यक्तीबरोबर घडली आहे.

जर्मनीचा नागरिक असलेला 40 वर्षीय एडगर्ड जियाबात 18 मार्चपासून दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर राहत होता. आता त्याला तेथे राहून 55 दिवस झाले आहेत.

एडगर्ड होनाई, व्हिएतनामवरून भारतात दाखल झाला होता. भारतातून तो इस्तांबूलसाठी विमान पकडणार होता. मात्र त्याच दिवशी देशातील सर्व विमानसेवा बंद करण्यात आल्यामुळे तो भारतातच अडकला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्हाला वाटले आम्ही त्याला जर्मनीला पाठवू. मात्र जर्मनीच्या दूतावासाने याला नकार दिला. जर्मनीत त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला परतण्याची परवानगी मिळाली नाही. टर्कीचा नागरिक नसल्याने त्यांनी देखील त्याला घेण्यास नकार दिला.

अधिकाऱ्यांनुसार, ट्रांसमिट भागात 24 तासांपेक्षा अधिक वेळ राहण्यास कोणालाच परवानगी नसते. मात्र मानवतेच्या दृष्टीने त्याला तेथे राहण्यास परवानगी दिली आहे. त्याला दिवसाला दोनदा जेवण देण्यात येत आहे, तसेच मच्छरदानी देण्यात आली आहे. तो बेंचवर झोपतो व त्याच्याकडे एकच बॅग आहे.

अखेर काल कोरोनाची चाचणी नेगेटिव्ह आल्यानंतर तो अ‍ॅम्सटरडॅमला रवाना झाला आहे.

Leave a Comment