हरणांच्या रक्षणासाठी बंदुकधारी शिकाऱ्यांशी भिडला हा 15 वर्षीय तरुण, नेटकऱ्यांकडून कौतुक

हरणांची शिकार करण्यासाठी आलेल्या शस्त्रधारी शिकाऱ्यांना पळून लावणाऱ्या राजस्थानमधील एका 15 वर्षीय तरूणाचे सोशल मीडियावर कौतूक केले जात आहे. जोधपूर येथील 15 वर्षीय मुकेश बिशनोईने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने 303 रायफल असलेल्या शिकाऱ्यांचा सामना करत त्यांना पळून लावले. गोळीचा आवाज ऐकताच मुकेश घटनास्थळी पोहचला असता, त्याला तेथे शिकारी दिसले.

10वीत शिकणाऱ्या मुकेश आणि त्याच्या 2 मित्राने धैर्याने 2 शिकाऱ्यांना भिडले. या झटपटीत शिकारी बंदूक तेथेच सोडून मृत चिंकाराला घेऊन अंधारात पळून गेले. या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली, असून तपास सुरू असल्याची माहिती ईआरडीएस फाउंडेशन या एनजीओने दिली आहे.

आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनी देखील मुकेशच्या या शौर्यासाठी त्याचे कौतूक केले. कासवान यांच्या ट्विटला आतापर्यंत 8 हजारांपेक्षा अधिक लाईक्स आले असून, नेटकऱ्यांनी देखील मुकेशच्या बहादुरीचे कौतूक केले आहे.

एनजीओने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मुकेशने सांगितले की, त्याने शिकाऱ्यांकडील बंदूक घट्ट पकडून ठेवली. मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले. त्याने व त्याच्या मित्रांनी गाडीवरून त्यांना शोधण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही.

Leave a Comment