सर्वसामान्यांना देखील मिळू शकते सैन्यात 3 वर्ष काम करण्याची संधी

भारतीय सैन्य सर्वसामान्य नागरिकांना सैन्यात ड्युटी करण्याची संधी देऊ शकते. लष्कर सर्वसामान्य भारतीय नागरिकांना तीन वर्षांसाठी ‘टूअर ऑफ ड्युटी’च्या प्रस्तावाचा विचार करत आहे. या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यास हा देशाच्या इतिहासातील क्रांतिकारी निर्णय ठरेल.

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, एका प्रस्तावावर विचार करण्यात येत आहे. ज्यात सर्वसामान्य नागरिकांना देखील देशाची सेवा करण्यासाठी सैन्यात दाखल होऊन तीन वर्षांसाठी टूअर ऑफ ड्युटीची संधी मिळू शकते.

भारतीय लष्कर देशातील सर्वोत्तम लोकांना आपल्या दलात समावेश करू इच्छित आहे. या प्रस्तावामुळे लष्कराचा हा उद्देश पुर्ण होईल. सध्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत सैन्यात दाखल होणाऱ्यांना कमीत कमी 10 वर्ष नोकरी करावी लागते. सैन्यात यापेक्षा कमी वर्ष नोकरीची तरतूद नाही.

लष्कराचे वरिष्ठ अधिकारी शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या तरतूदींची समिक्षा करत आहे. जेणेकरून युवकांना आकर्षित करता येईल. सैन्यात वर्षांपासून अधिकाऱ्यांची कमतरता आहे, त्यामुळे कमिशनमध्ये लवकरात लवकर बदल करण्याचा विचार आहे.

Leave a Comment