जिम उघडण्यासाठी निदर्शकांचे चक्क न्यायालयाबाहेरच पुशअप्स

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दैनंदिन जीवनात मोठा बदल झाला आहे. सर्वकाही बंद असल्याने नागरिक घरात कैद आहेत. जिम बंद असल्याने फिटनेसची आवड असलेले घरातच व्यायाम करत आहेत. मात्र अमेरिकेतील प्लोरिडा येथे जिम सुरू करण्यासाठी चक्क निदर्शन करण्यात आली आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जवळपास 30 लोकांनी हातात बँनर घेऊन क्लिरवॉटर येथील पिनॅल्लास काँटी कोर्टहाउस बिल्डिंग समोर जिम सुरू करण्यासाठी निदर्शन केली. एवढेच नाहीतर यातील काहीजणांनी चक्क भर उन्हात रस्त्यावरच पुशअप्स आणि क्रंचेस मारण्यास सुरूवात केली. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी मास्क देखील लावले नव्हते व सोशल डिस्टेंसिंगचे देखील पालन केले नाही.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी म्हटले की, जर निदर्शक रस्त्यावर पुशअप्स करू शकतात, तर नक्कीच घरी देखील व्यायाम करू शकतात.

Leave a Comment