नारळाचे तेल; त्वचेसाठी वरदान


कित्येक शतके आपण आपल्याकडे परंपरेने चालत आलेल्या अनेक घरगुती उपायांचा अवलंब करीत आलो आहोत. पण जसजसा काळ बदलला, तसतसे हे उपाय देखील काहीसे बदलत गेले. आपल्या आसपासच्या वातावरणामध्ये सतत वाढती कमान असलेले प्रदूषण, आपली बदलती जीवनशैली, यांच्या मुळे आपले आरोग्य, त्वचा आणि केस यांच्यावर दुष्परिणाम दिसून येऊ लागले आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्याच्या बदलत्या गरजांच्या नुसार आपण आपल्या केसांच्या, त्वचेच्या आरोग्याकरिता करीत असलेल्या उपायांमध्ये देखील बदल करण्याची गरज आहे. यासाठी बाजारामध्ये अनेक तऱ्हेची प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. पण केवळ एका वस्तूने आपण आपली त्वचा, आणि केस यांची उत्तम काळजी घेऊ शकतो, ते म्हणजे नारळाचे , किंवा खोबरेल तेल.

नारळाचे तेल हे केवळ केसांसाठी नव्हे तर आपल्या त्वचेकरिता देखील वरदान आहे. याच्या वापराने त्वचेवर फ्री रॅडीकल्सचे परिणाम नाहीसे होतात. खोबरेल तेलामध्ये अँटी ऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त आहे. यामुळे त्वचेतील घातक द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. नारळाचे तेल उत्तम मॉईश्चरायझर आहे. सर्व प्रकारच्या त्वचेसाठी नारळाचे तेल गुणकारी आहे. याच्या नियमित वापराने त्वचेवरील सुरकुत्या नाहीशा होण्यास मदत होते. नारळाच्या तेलाचे गुण आणखी वाढविण्याकरिता त्यामध्ये कापूर घालून हे तेल चेहऱ्याला लावावे व दहा मिनिटे चेहऱ्यावर राहू द्यावे. ह्या कापूरमिश्रित तेलाने त्वचेची निरनिराळी इन्फेक्शन्स दूर होण्यास मदत होते. हे मिश्रण बनविण्यासाठी शंभर ग्राम नारळाच्या तेलामध्ये एक कापुराची मिसळावी. त्वचेवरील भाजल्याचे वण, ताचांवरील भेगा, त्वचेवर आलेले काळे डाग हटविण्यासाठी कापूर मिश्रित तेल वापरावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment