Video : रस्त्यावर थुंकणाऱ्याला पोलिसांनी अशी घडवली अद्दल

कोरोना व्हायरस महामारीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी थुंकणे धोकादायक ठरू शकते. यामुळे अनेक राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी थुंकणे गुन्हा ठरवले असून, यासाठी दंड देखील आकारला जाणार आहे. मात्र असे असले तरी अनेकजण सर्रासपणे रस्त्यावर थुंकताना दिसतात.

अशीच घटना चंदीगड येथे समोर आली. येथे एक व्यक्ती रस्त्यावर थुंकल्याने ट्रॅफिक मार्शलने त्या व्यक्तीला सफाई करण्यास सांगितले. यानंतर व्यक्ती स्वतःच्या हाताने घाण साफ करतो. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आपल्या मुलाबरोबर चाललेल्या या व्यक्तीला रस्त्यावर थुंकल्याने ते स्वच्छ करण्याची शिक्षा देण्यात आली. यानंतर ट्रॅफिक मार्शलने या व्यक्तीला त्याच्या चुकीबाबत समजवले व अशी चूक पुन्हा न करण्याची चेतावणी दिली. यानंतर व्यक्तीने देखील आपली चूक मान्य करत माफी मागितली.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी ट्रॅफिक मार्शलच्या कृत्याचे कौतूक केले व हे नियम संपुर्ण भारतात लागू करावे असे म्हटले आहे.

Leave a Comment