वैज्ञानिकांनी शोधला पृथ्वी सारखा दुसरा ग्रह

वैज्ञानिकांनी अंतराळात पृथ्वी सारख्या दिसणाऱ्या ग्रहाचा शोध लावला आहे. हा ग्रुह सुर्याच्या दहाव्या भागा एवढ्या मोठ्या एका ताऱ्याची  परिक्रमा करत आहे. हा ग्रह पृथ्वीपासून 25000 प्रकाश वर्ष लांब असून, या ग्रहाचा शोध न्यूझीलंडच्या यूनिव्हर्सिटी ऑफ कॅटरबरीच्या वैज्ञानिकांनी लावला आहे. त्यांनी या ग्रहाचा शोध लाखात एक असल्याचे म्हटले असले तरी हा ग्रह आहे की नाही यावरून वाद सुरू आहेत. दुसऱ्या अंतराळ वैज्ञानिकांनी याला एक्सोप्लॉनेट म्हटले आहे.

वैज्ञानिकांनी सांगितले की, आतापर्यंत जवळपास 4 हजार एक्सोप्लॉनेटचा शोध लावण्यात आलेला आहे. यातील खूप कमी असे आहेत, ज्यांचे ऑर्बिट पृथ्वी सारखे आहे. हा ग्रह ज्या ताऱ्याची परिक्रमा करत आहे, त्याचे द्रव्यमान एवढे कमी आहे की त्याची अद्याप ओळख पटलेली नाही.

वैज्ञानिकांनुसार, हा ग्रह आकाशगंगेतील त्या भागाची परिक्रमा करत आहे जेथे ताऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भविष्यात हा ग्रह आपला तारा सोडून दुसऱ्या ताऱ्याची परिक्रमा करण्याची देखील शक्यता आहे. या ग्रहाच्या शोधासंदर्भात पेपर लिहिणारे हेरेरा मार्टिन म्हणाले की, कमी प्रकाशामुळे या ताऱ्याला स्पष्ट पाहण्यासाठी 5 दिवस लागले. ताऱ्याची व्यवस्थित निरिक्षण केल्यानंतर आम्हाला ग्रह दिसला.

त्यांनी सांगितले की, ग्रह ज्या ताऱ्याची परिक्रमा करत आहे, त्या ताऱ्याचे द्रव्यमान सुर्याच्या द्रव्यमानाच्या 10वा भाग आहे. हा ग्रह पृथ्वी आणि नेपच्यूनच्या मध्यभागी आहे. आपल्या सौरमंडळानुसार या ग्रहाचे ऑर्बिट पृथ्वी आणि शुक्रमधील अंतराएवढे आहे. येथील एक वर्ष पृथ्वीच्या 617 दिवसांन समान आहे.

Leave a Comment