त्या व्यक्तीच्या कार पार्किंगसाठी वापरलेल्या कल्पनेवर आनंद महिंद्रा फिदा

भारतात गाडीच्या पार्किंगची मोठी समस्या आहे. अरुंद जागेत व्यवस्थित गाडी पार्क करणे चालकांसाठी मोठीच डोकेदुखी असते. कॉम्प्लॅक्स आणि मॉलमध्ये तर पार्किंगसाठी भरपूर पैसे आकारले जातात. मात्र काहीजण गाडीच्या पार्किंगसाठी भन्नाट शक्कल लढवत असतात. असाच एक व्हिडीओ महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कारचालक हुशारीने अरुंद जागेत कार पार्क करतो. आधी तो एका स्टँडवर मारुती झेन कार चढवतो व त्यानंतर धक्का देत कारला जिन्या खाली असलेल्या रिकाम्या जागेत सहज पार्क करतो. व्यक्तीने भन्नाट कल्पना वापरत घराच्या जिन्याखालील जागेत कारसाठी पार्किंग तयार केले आहे.

आनंद महिंद्रांना हे टेक्निक भलतेच आवडले. त्यांनी लिहिले की, काही दिवसांपुर्वी पंजाबमध्ये अशाच डिव्हाईसचा एक व्हिडीओ पाहिला होता. मात्र हा त्याचा पुढील टप्पा आहे. भौमितिक पद्धतीने केलेले समाधान मला आवडते. मी दावा करतो की ज्या व्यक्तीने हे डिझाईन बनवले आहे तो आपल्या आयडियाने आमच्या फॅक्टरी ले आउटला अधिक चांगले बनवू शकतो.

Leave a Comment