मदत कार्यासाठी युएई दाखल झालेल्या 88 भारतीय नर्सचे जंगी स्वागत

जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. प्रत्येक देश परदेशात अडकलेल्या आपल्या नागरिकांना मायदेशी आणण्याचा प्रयत्न करत आहे. भारत देखील परदेशात अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत आणत आहे. याच पार्श्वभुमीवर आता भारताने संयुक्त अरब अमिरातच्या मदतीसाठी 88 नर्सची टीम पाठवली आहे. विमानतळावर या नर्सेसचे गुलाब देऊन भव्य स्वागत करण्यात आले.

नर्सेसचा हा व्हिडीओ पीआयबी एन महाराष्ट्राने आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की भारतीय नर्सेसचे गुलाब देऊन स्वागत केले जात आहे.

व्हिडीओ शेअर करताना पीआयबीने लिहिले की, काही लोक परत येत आहेत, तर हे लोक जात आहेत. गरजेच्या वेळी मदत करणे हे भारत आणि यूएईमधील सहकार्य दर्शवते.

Loading RSS Feed

Leave a Comment