विक्रीसाठी येताच काही मिनिटात रेडमी नोट प्रो आउट ऑफ स्टॉक


फोटो साभार जागरण
दीर्घ प्रतिक्षेनंतर भारतात प्रथमच सेलसाठी उपलब्ध झालेल्या शाओमीच्या रेडमी नोट ९ प्रो बाबत भारतीय ग्राहकांचा उत्साह इतका होता की काही मिनिटात हा फोन आउट ऑफ स्टॉक झाल्याचे शाओमी इंडिया हेड मनुकुमार जैन यांनी ट्विटरवर पोस्ट केले आहे. पण पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यात ग्राहकांना हा फोन खरेदी करण्याची संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

वास्तविक शाओमीने या वर्षात रेडमी नोट ९ प्रो भारतात लाँच केला होता पण करोनामुळे लॉक डाऊन लागल्याने तो सेलसाठी उपलब्ध होऊ शकला नव्हता. तो विक्रीसाठी कधी येतोय याची ग्राहकांना प्रतीक्षा होती आणि त्यामुळे तो सेलसाठी येताच ग्राहकांची हा फोन खरेदीसाठी एकच झुंबड उडाली असे सांगितले जात आहे. हा फोन भारतात तीन व्हेरीयंट मध्ये उपलब्ध असून ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजची किंमत १६४९९, १२८ जीबी स्टोरेजची किंमत १७९९९ तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजची किंमत १९९९९ रुपये आहे.

विशेष म्हणजे या फोनसाठी ६.७ इंची फुल एचडी स्क्रीन दिला गेला असून कंपनीचा स्मार्टफोन साठी आत्तापर्यंत दिलेल्या स्क्रीन मध्ये सर्वात मोठा आहे. फोनच्या रिअरला क्वाड कॅमेरा सेट आणि फ्रंटला ३२ एमपीचा कॅमेरा दिला गेला आहे. प्रायमरी कॅमेरा ६४ एमपीचा आहे.

Leave a Comment