मोदींचे आर्थिक पॅकेज, उद्योग जगताच्या प्रतिक्रिया

भारत करोना विरुद्धच्या लढाईत धैर्याने आणि पूर्ण क्षमतेने उभा असल्याचे सांगतानाच पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केल्यानंतर उद्योग क्षेत्राकडून प्रतिक्रियांचा पाउस पडला आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्र यांनी ट्विट करून पंतप्रधानांचे ‘ कार्पे डीयम’ भाषण जगण्याच्या प्रयासाच्या दृष्टीने संधीचे सोने करून नवीन ताकद निर्माण करेल असे म्हटले आहे. या पॅकेजबाबतची सविस्तर माहिती बुधवारी जाहीर होणार आहे त्यामुळे मंगळवारी रात्री चांगली झोप येणार नाही असेही त्यांनी या ट्विट मध्ये नमूद केले आहे.

anand mahindra

✔@anandmahindra

 

 

This was the PM’s Carpe Diem (Seize the Day) speech; an opportunity to change the narrative from ‘Survival’ to ‘Strength.’ We will know tomorrow whether or not this is going to be a transformational moment like 1991. What I also believe is I won’t get much sleep tonight!

35.8K

10:19 PM – May 12, 2020

Twitter Ads info and privacy

7,231 people are talking about this

उद्योग जगताने असे पॅकेज हीच या वेळेची गरज होती असे मत व्यक्त करताना त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या पुनरुद्धारासाठी मदत मिळेल, आर्थिक वृद्धीला गती मिळेल असे म्हटले आहे. सीआयआयचे महाव्यवस्थापक चंद्रजीत बॅनर्जी यांनी जमीन, श्रम, रोकड व कायदे सरळ सुलभ बनविण्याच्या मोदींच्या घोषणेचे स्वागत केले आणि या चार क्षेत्रात सुधारणा म्हणजे संकटकाळात आर्थिक वृद्धीला नवी गती असे समीकरण असल्याचे सांगितले.

 

फिक्की अध्यक्ष संगीता रेड्डी यांनी मोदींनी सांगितलेले पाच आधार मजबूत केल्यास भारत सतत वृद्धीच्या मार्गावर राहील असे मत व्यक्त केले तर असोचेम आणि नारेडचे अध्यक्ष डॉ.निरंजन हिरानंदानी यांनी देशाच्या अर्थगतीला वेग येण्यासाठी हे पॅकेज खरोखरच उल्लेखनीय असल्याचे मत दिले. ते म्हणाले कोविड १९ संकट काळात अश्याच पॅकेजची प्रतीक्षा होती.

Leave a Comment