न्युयॉर्क टाईम स्क्वेअरमधील ‘ट्रम्प डेथ क्लॉक’ चर्चेत


फोटो साभार ओपन
अमेरिकेत करोना मुळे नागरिकांचे जीव जाण्याचे प्रमाण अजूनही म्हणावे तसे कमी झालेले नसतानाच न्युयॉर्कच्या प्रसिद्ध टाईम स्क्वेअर मध्ये लागलेले ‘ ट्रम्प डेथ क्लॉक ‘ चर्चेत आले आहे. हा एक मोठा बिलबोर्ड असून त्यावर करोना साथीमध्ये जीव गमावलेल्या लोकांची संख्या दाखविली जात आहे. सरकारी लापरवाही आणि उदासीनता यामुळे या लोकांना जीव गमवावा लागला असे म्हटले जात असून या क्लॉकचे डिझाईन फिल्म निर्माता युजीन जेर्की यांनी केले आहे. करोना महामारीमुळे रिकाम्या पडलेल्या टाईम स्क्वेअर मधील उंच इमारतीवर हे क्लॉक लावले गेले आहे.

युजीन याना दोनवेळा सन डान्स फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले आहे. असे क्लॉक लावण्यामागाचे कारण असे सांगितले जात आहे की करोना प्रसाराच्यावेळी ट्रम्प यांनी वेळीच योग्य निर्णय घेतले असते तर या साथीत बळी पडलेल्या अनेकांचे प्राण वाचू शकले असते. सरकारी दुर्लक्षामुळे सोमवार पर्यंत फक्त न्युयॉर्क मध्ये ४८ हजाराहून अधिक मृत्यू झाले आहेत तर संपूर्ण अमेरिकेत ८० हजाराहून अधिक लोकांचा करोनाने जीव घेतला आहे.

ट्रम्प यांनी वेळीच उपाययोजना केली असती तर हा आकडा निम्म्याने कमी होऊ शकला असता असे म्हटले जात असून ट्रम्प डेथ क्लॉक या विचारातूनच लावले गेले आहे. वेळीच उपाय योजना झाली असती तर कोविड १९ मुळे झालेले ६० टक्के मृत्यू टाळता आले असते. ट्रम्प प्रशासनाने त्यासाठी १६ मार्च ऐवजी ९ मार्च पासून सोशल डीस्टन्सिंग बंधनकारक करण्याचा निर्णय घेऊन शाळा बंद करायला हव्या होत्या असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment